फ्युचरटेक

350.00

आधुनिक सेवाक्षेत्राचा इतिहास काही दशकांचाच आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर आलेल्या इंटरनेट आणि मोबाईल्समुळे जगणं सुखद, सुकर आणि कमालीचं वेगवान झालं

आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0-5.0 यांचं पर्व सुरू झालं आहे. आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याची ताकद या तंत्रज्ञानांमध्ये आहे. मेंदूशास्त्रापासून भविष्यातल्या उपचारपद्धतींपर्यंत, भविष्यातली घरंशहरं, प्रवास आणि अंतराळापर्यंत, एआयपासून नॅनो टेक्नॉलॉजीपर्यंत, कॉम्प्युटर्सपासून इंडस्ट्री 4.0-5.0 आणि अगदी सायबर वॉर घडवू पाहणारी तंत्रज्ञानं धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होणार आहेत

ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस, माइंडक्लोन्स, भविष्यातले औषधोपचार, एक्टोजेनेसिस, स्मार्ट सिटीज, स्पेस टुरिझम, स्पेस मायनिंग, परग्रहावरील वस्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी, नॅनो टेक्नोलॉजी, बायो कॉम्प्युटर्स, क्वांटम कॉम्प्युटर्स, सेन्सर्स, लाय फाय, सायबर वॉर, होलोग्राम अशा भविष्याला आकार देऊ शकणाऱ्या निवडक तंत्रज्ञानांचा आढावा घेणारं पुस्तकफ्युचरटेक‘!

Categories: , ,

अच्युत गोडबोले : कॉम्प्युटरविषयी इंग्रजीत चार पाठ्यपुस्तकांचं लेखन. या पुस्तकांचा चीनी भाषेतही अनुवाद. व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0-5.0, गणित, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, चंगळवाद, मानसशास्त्र, मनोविकार, गुलामगिरी, कायदा, संगीत, साहित्य, चित्रशिल्पकला, चित्रपट, अन्न, भविष्यातलं तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मराठी पुस्तकांचं लेखन. अनेक पुरस्कार प्राप्त.

आसावरी निफाडकर वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या आसावरी पुष्कर निफाडकर यांनी वेब डिझायनिंग क्षेत्रात प्रशिक्षकाचंही काम केलं आहे. कथा, कादंबरी, कविता या मूळ साहित्य प्रकारांबरोबरच ललितेतर, विज्ञान, तंत्रज्ञान हे त्यांच्या कुतूहलाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. विज्ञान, मानसशास्त्र, भविष्यातलं तंत्रज्ञान अशा अनेक ज्ञानशाखांविषयी कित्येक वर्षं वाचन आणि अभ्यास. सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहलेखिका म्हणून त्या गेली कित्येक वर्षं कार्य करत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फ्युचरटेक”

Your email address will not be published. Required fields are marked *