अच्युत गोडबोलेः कॉम्प्युटरविषयी इंग्रजीत चार पाठ्यपुस्तकांचं लेखन. या पुस्तकांचा चीनी भाषेतही अनुवाद. व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0-5.0, गणित, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, चंगळवाद, मानसशास्त्र, मनोविकार, गुलामगिरी, कायदा, संगीत, साहित्य, चित्र–शिल्पकला, चित्रपट, अन्न, भविष्यातलं तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मराठी पुस्तकांचं लेखन. अनेक पुरस्कार प्राप्त.
अमृता देशपांडेः जीवशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, अन्न आणि आहार या विषयांवर अच्युत गोडबोले यांच्यासह शरीर, सजीव, अन्न, डिप्रेशन, वैद्यकायन, भन्नाट शोध, भन्नाट वैद्यक आणि षड्रिपू अशी 8 पुस्तकं लिहिली आहेत. आहारशास्त्रावर आधारित ‘आहार‘ हे पुस्तक. काही जगप्रसिद्ध पुस्तकांचं मराठीत भाषांतर. अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रात नियमितपणे स्तंभलेखन. अत्यंत मानाची साहित्यासाठीची 2023ची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप‘ प्राप्त. लिखाण आणि एकंदर साहित्यक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मराठी विज्ञान परिषदेसहित अनेक पुरस्कार प्राप्त.
Reviews
There are no reviews yet.