सावरकर : विस्मृतीचे पडसाद (1883-1924)

999.00

हिंदुत्व विचारसरणीचे वैचारिक स्रोत असलेले सावरकर हे निःसंशयरीत्या विसाव्या शतकातील सर्वांत वादग्रस्त ठरलेले विचारवंत आणि नेते होते. एकीकडे उदात्तीकरण करणारी स्तुती तर दुसरीकडे त्यांना आसुरी ठरवणारी निंदा या दोन टोकांत त्यांच्या दीर्घ आणि वादळी जीवनाची कथा दोलायमान झाली आहे. या दोन टोकांमध्ये असलेले सत्य दुर्दैवाने कधीच सामोरे आणले गेले नाही. ते आणि त्यांची विचारसरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विशेषतः महात्मा गांधींची, त्यांच्या अहिंसेची प्रबळ आणि प्रखर विरोधक म्हणून समोर येते

जगभरातील आणि भारताच्या अभिलेखागारांतील मूळ कागदपत्रांचे विस्तृत संशोधन करून दोन खंडात्मक चरित्र साकार झाले आहे. त्यापैकी या पहिल्या खंडात सावरकरांचा त्यांना जन्मठेपेकडे घेऊन जाणारा प्रवास ते अखेर काळ्यापाण्यातून मुक्तता होईपर्यंतचा जीवनपट मांडण्यात आला आहे. यातून सावरकर, त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी यांबद्दलचा नवीन दृष्टिकोन समोर येतो आणि त्यांच्या यशापयशावर एक नवा प्रकाश पडतो.

Categories: ,

बंगळुरू येथील इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. विक्रम यांनी लिहिलेले दोन खंडांतील सावरकर चरित्र : सावरकर : एकोज फ्रॉम फरगॉटन पास्ट आणि सावरकर : कनटेस्टेड लिगसी राष्ट्रीय बेस्टसेलर ठरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची प्रशंसा केली आहे. डॉ. संपत यांना नुकताच यूकेच्या प्रतिष्ठित रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीचे फेलो हा बहुमान देण्यात आला आहे. विक्रम यांना साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्याचा पहिला युवा पुरस्कार प्राप्त झाला असून, गौहर जान यांच्यावरील पुस्तकासाठी उत्कृष्ट ऐतिहासिक संशोधनाकरता असलेल्या न्यू यॉर्क येथील . आर. एस. सी. आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सावरकर : विस्मृतीचे पडसाद (1883-1924)”

Your email address will not be published. Required fields are marked *