मृणालिनी चितळे : कथा, ललित लेख, मुलाखत, नाटुकली अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन. स्त्री मासिकामध्ये कार्यकारी संपादक पदावर सहा वर्षे काम. एकूण 22 पुस्तके प्रकाशित. पुस्तकांना राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर बारा वर्षे कार्यरत. स्त्री साहित्याचा मागोवा या प्रकल्पासाठी प्रबंध लेखन. कौन्सिलिंग आणि कुटुंब न्यायालय या क्षेत्रात विशेष काम. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील कार्यक्रमात सहभाग. पुणे महानगरपालिकेतर्फे सामाजिक कामासाठी गौरवपदक देऊन सन्मान. साहित्यदीप संस्थेतर्फे कथादीप पुरस्कार, तसेच अनेक मानाचे पुरस्कार. साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानासाठी तेजस्विनी पुरस्कार.
Reviews
There are no reviews yet.