आहार

399.00

आहारशास्त्र ही विज्ञानशाखा नवीनच असली, तरी आता त्याविषयी भरपरू माहिती आणि ज्ञान उपलब्ध आहे; पण बहुतांश पुस्तकं ही वजन वाढवावजन घटवाहे सांगणारी किंवा फार फार तर मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार कसे नियंत्रणात आणायचे अशा आशयाची असतात. हे पुस्तक मात्र सर्वार्थाने संसर्गजन्य आजार, विभिन्न प्रकारचे कर्करोग, पचनसंस्थेचे आजार, खाण्याबद्दलचे मानसिक विकार, हृदय, किडनी, यकृत, पित्ताशय, पँक्रियाज यांचे आजार आणि अभावजन्य आजार अशा जवळपास सगळ्याच आजारविकारांमध्ये कोणता आहार घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करते. या पुस्तकात व्हिटॅमिन्स प्रोटीन्स या अन्नघटकांची ओळख आणि त्यांच्या संशोधनाची रोचक कथा आहे, तसेच आहारातील घटकांचा पोषणशास्त्राच्या दृष्टीनं आणि जैवरसायनशास्त्राच्या दृष्टीनं (बायोकेमिस्ट्री) केलेला विचार आहे. हे पुस्तक सर्व वयोगटांतल्या वाचकांसाठी, आहारशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, आहारतज्ज्ञांसाठी आणि निरोगी शतायुषी होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.

Categories: ,

अमृता देशपांडे या आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि मराठी साहित्यक्षेत्रातील सुप्रसिद्ध लेखिका म्हणून परिचित आहेत. विविध दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक पुस्तकांचं संपादनही त्यांनी केलं आहे. जीवशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, अन्न आणि आहार या विषयांवर अच्युत गोडबोले यांच्यासह शरीर, सजीव, अन्न, डिप्रेशन, वैद्यकायन, भन्नाट शोध, भन्नाट वैद्यक आणि षड्रिपू अशी 8 पुस्तकं लिहिली आहेत. अर्नेस्टो चे गव्हेरा याच्या मोटारसायकल डायरीज, नोबेल पारितोषिक विजेत्या डॅनियल कानेमन यांच्या थिंकिग फास्ट अँड स्लोयासह 6 जगप्रसिद्ध पुस्तकांचं भाषांतर केले आहे. त्या अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांत नियमितपणे स्तंभलेखन करतात. त्यांना अत्यंत मानाची साहित्यासाठीची 2023ची शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमिळाली आहे, तसेच लिखाण आणि एकंदर साहित्यक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मराठी विज्ञान परिषदेसहित अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रोटरी क्लब आणि नगरकर युथ फाउंडेशनतर्फे दिला जाणारा 2024चा नारीशक्ती पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आहार”

Your email address will not be published. Required fields are marked *