भन्नाट शोध

300.00

या विश्वात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, जो सतत काहीतरी नवं शोधू पाहत असतो. माणसाच्या या शोधक वृत्तीमुळेच हे जग पूर्वीपेक्षा इतकं बदललंय की, पंचमहाभूते सोडून जवळपास अन्य सगळ्याच गोष्टी मानवनिर्मित आहेत आणि त्या आधुनिक जगाला नव्यानं आकार देत आहेत. नावीन्याचा ध्यास असलेल्या माणसानं स्वतःच्या सोयीसाठी नवी उपकरणं आणि वस्तू शोधल्या म्हणूनच तर आपलं जगणं आधीपेक्षा सोपं, सुकर आणि आरामदायी होऊ शकलं. हे सगळे शोध कोणी हेतुपुरस्सर शोध लावायचे म्हणून संशोधन करून किंवा प्रयोगशाळेतही लावलेले नाहीत. कित्येक शोध हे सर्वसामान्य माणसांनी स्वतःचं किंवा आपल्या जवळच्या लोकांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून लावले; पण या शोधांनी केवळ एका समूहाचं नाही, तर अखिल मानवजातीचं जीवन सहजसोपं केलं हे मात्र विसरता येत नाही. सुईगुंडी, सेफ्टी पीन, चप्पलबूट, ब्रशटूथपेस्ट, साबण, रस्ते, लिफ्ट अशा रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूंच्या शोधांची ही रंजक कथा.

Categories: ,

अच्युत गोडबोले कॉम्प्युटरविषयी इंग्रजीत चार पाठ्यपुस्तकांचं लेखन. या पुस्तकांचा चीनी भाषेतही अनुवाद. व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0-5.0, गणित, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, चंगळवाद, मानसशास्त्र, मनोविकार, गुलामगिरी, कायदा, संगीत, साहित्य, चित्रशिल्पकला, चित्रपट, अन्न, भविष्यातलं तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मराठी पुस्तकांचं लेखन. अनेक पुरस्कार प्राप्त.

अमृता देशपांडे जीवशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, अन्न आणि आहार या विषयांवर अच्युत गोडबोले यांच्यासह शरीर, सजीव, अन्न, डिप्रेशन, वैद्यकायन, भन्नाट शोध, भन्नाट वैद्यक आणि षड्रिपू अशी 8 पुस्तकं लिहिली आहेत. आहारशास्त्रावर आधारित आहारहे पुस्तक. काही जगप्रसिद्ध पुस्तकांचं मराठीत भाषांतर. अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रात नियमितपणे स्तंभलेखन. अत्यंत मानाची साहित्यासाठीची 2023ची शरद पवार इन्स्पायर फेलोशिपप्राप्त. लिखाण आणि एकंदर साहित्यक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मराठी विज्ञान परिषदेसहित अनेक पुरस्कार प्राप्त

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भन्नाट शोध”

Your email address will not be published. Required fields are marked *