लेखकाविषयी
बंगळुरू येथील इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. विक्रम यांनी लिहिलेले दोन खंडांतील सावरकर चरित्र : सावरकर : एकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट आणि सावरकर : अ कनटेस्टेड लिगसी राष्ट्रीय बेस्टसेलर ठरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची प्रशंसा केली आहे. डॉ. संपत यांना नुकताच यूकेच्या प्रतिष्ठित रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीचे फेलो हा बहुमान देण्यात आला आहे. विक्रम यांना साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्याचा पहिला युवा पुरस्कार प्राप्त झाला असून, गौहर जान यांच्यावरील पुस्तकासाठी उत्कृष्ट ऐतिहासिक संशोधनाकरता असलेल्या न्यू यॉर्क येथील ए. आर. एस. सी. आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
Reviews
There are no reviews yet.