शिवराज्याभिषेक

799.00

मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी 19-20व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविधांगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्यविश्वातील आजवरची मोठी उणीवच होती. छत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर्णनांसोबतच या ग्रंथात आधुनिक इतिहासकारअभ्यासकांनी शिवराज्याभिषेकासंदर्भात केलेले लेखन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या संपादकत्वाखाली एका सूत्रात गुंफण्यात आले आहेत. शिवराज्याभिषेकाची सांगोपांग माहिती देत या घटनेमुळे झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उत्क्रांतीची चर्चा करणारा मराठी साहित्यविश्वातील हा पहिलाच प्रयोग आहे.

Categories: ,

लेखकाविषयी

यशोधन जोशी हे मूळचे कोल्हापूरचे असून ते गेली अनेक वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. आठवणीतील शिकारया संस्थानकालीन शिकारीबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकाचे त्यांनी लेखन केलेले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे नानाविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या धांडोळाया लोकप्रिय ब्लॉगचे ते लेखक आहेत. विविध दिवाळी अंक, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमातून ते नियमित लेखन करत असतात. स्थानिक इतिहास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी कोल्हापूरचे अनेक अज्ञात पैलू प्रकाशात आणलेले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवराज्याभिषेक”

Your email address will not be published. Required fields are marked *