द हाउस ऑफ पेपर

350.00

या कादंबरीतल्या नायकाबद्दल वाचत असताना तुम्ही जर चोखंदळ वाचक असाल, तर या कादंबरीतल्या बऱ्याच गोष्टींशी तुम्ही आपसूक रिलेट होत जाल. एका संध्याकाळी कार्लोसचा मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी जातो, तेव्हा कार्लोसच्या हातात एक वाईनचा ग्लास असतो आणि समोरच्या टिपॉयवर डॉन किहोतेची उत्कृष्ट प्रत ठेवलेली असते आणि त्या प्रतीच्या शेजारीच आणखीन एक वाईन भरलेला ग्लास असतो म्हणजेच कार्लोस त्या पुस्तकांसोबत डिनर घेत असतो. अशा कितीतरी गोष्टींशी पट्टीचा वाचक सतत रिलेट होत असतो. कार्लोस ब्रॉअर, त्याचं पुस्तक, त्याचा संग्रह, त्याचा एकटेपणा, विक्षिप्तपणा, सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहण्याची त्याची सवय, एखाद्या अतिशय आवडत्या कादंबरी सोबत जगण्याची असोशी हे सगळं तुम्हाला कदाचित ओळखीचं वाटू शकेल. पुस्तकांची, पुस्तकांच्या माणसांची, पुस्तकांच्या गूढ असण्यानसण्याची ही कादंबरी वाचताना या कादंबरीतली काही वाक्यं इथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. या कादंबरीची मांडणी एखाद्या थ्रिलरसारखी आपल्याला धरून ठेवते. शिवाय तिची मांडणी अत्यंत पोएटिक वाटते.

 

Categories: ,

भाषांतरकाराविषयी : अभिषेक धनगर 

अभिषेक धनगर यांनी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. काही वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन केल्यानंतर त्यांनी आपली मूळ आवड असलेल्या साहित्यव्यवहारात पूर्ण वेळ काम करण्याचे निश्चित केले. वॉल्डन बुकस्टोअरच्या माध्यमातून आजवर त्यांनी अनेक वाचकांपर्यंत मराठीतील दुर्मीळ उच्च साहित्यमूल्य असलेली आगळीवेगळी पुस्तकं पोहोचवली आहेत. त्यांना अत्यंत मानाची समजली जाणारी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (साहित्य)’ मिळाली असून, त्या अंतर्गत हाउस ऑफ पेपर हे त्यांचे पहिलेच भाषांतरीत पुस्तक प्रकाशित झाले. यापूर्वी विविध नियतकालिकं आणि वेब पोर्टल्सवर त्यांनी केलेल्या कथात्म साहित्याची, कवितांची आणि लेखांची भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. सध्या ते जगभरातील विविध भाषांतील कथात्म साहित्याचे मराठी भाषांतर, संपादन अशा मौलिक ग्रंथांच्या निर्मिती संयोजनाचे काम पाहत आहेत.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द हाउस ऑफ पेपर”

Your email address will not be published. Required fields are marked *