अच्युत गोडबोले : कॉम्प्युटरविषयी इंग्रजीत चार पाठ्यपुस्तकांचं लेखन. या पुस्तकांचा चीनी भाषेतही अनुवाद. व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0-5.0, गणित, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, चंगळवाद, मानसशास्त्र, मनोविकार, गुलामगिरी, कायदा, संगीत, साहित्य, चित्र–शिल्पकला, चित्रपट, अन्न, भविष्यातलं तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मराठी पुस्तकांचं लेखन. अनेक पुरस्कार प्राप्त.
आसावरी निफाडकर ः वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या आसावरी पुष्कर निफाडकर यांनी वेब डिझायनिंग क्षेत्रात प्रशिक्षकाचंही काम केलं आहे. कथा, कादंबरी, कविता या मूळ साहित्य प्रकारांबरोबरच ललितेतर, विज्ञान, तंत्रज्ञान हे त्यांच्या कुतूहलाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. विज्ञान, मानसशास्त्र, भविष्यातलं तंत्रज्ञान अशा अनेक ज्ञानशाखांविषयी कित्येक वर्षं वाचन आणि अभ्यास. सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहलेखिका म्हणून त्या गेली कित्येक वर्षं कार्य करत आहेत.





Reviews
There are no reviews yet.