₹230.00
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज श्रीरामाचे अत्युच्च कोटीचे भक्त होते. त्यांच्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा उत्तम मिलाफ झाला होता. अशा परमश्रेष्ठ भक्ताचं, संताचं चरित्र लेखिकेने ग्रंथरूपात लिहिले आहे. महाराजांच्या चरित्राचा नीट अभ्यास केला, तर असं लक्षात येतं की, त्यांच्यात उत्तम भक्त होण्याची सुप्त क्षमता उपजतच होती. संस्कारक्षम वयात गुरूंच्या घरी राहून, त्यांचं जवळून निरीक्षण करून अध्यात्म जगायचं कसं असतं, याचा योग्य प्रकारे अभ्यास त्यांनी केल्यामुळे त्यांच्यातील या सुप्त क्षमतेचा विकास आणि आविष्कार त्यांच्या जीवनात घडला. घरातलं आई–वडिलांचं वागणं, बोलणं, व्यवहार आणि एकंदरीत अनुकूल वातावरणाचीदेखील त्यांना मदत झाली. अखंड रामनाम घेत गेल्यामुळे त्यांचं आत्मभान सुधारत गेलं, विकसित होत गेलं म्हणजेच सेल्फ अवेअरनेस किंवा आपल्या असण्याची जाणीव अधिकाधिक सूक्ष्म, तरल, मूलगामी होत गेली.
“आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते; परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ होत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन झाले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.”
Reviews
There are no reviews yet.