निलू निरंजना

300.00

निलू निरंजनाएकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगणारी ही मस्त कलंदर! अमेरिकेमध्ये कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रातील तिची नोकरी. मातृभूमीचे ॠण स्मरून समाजकार्यासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या. चोरांनी केलेला प्राणघातक हल्ला आणि त्यातूनही नव्याने उभी राहिलेली तिच्यातील लढवय्यी! एका मध्यमवर्गीय कौटुंबिक चौकटीत वाढलेली, तरीही निर्भयपणे एकटीनं जगप्रवास करणारी. कॉर्पोरेट जगाचा ताण पेलत असताना तिनं जपली सद्हृदयता आणि वर्तमानातला क्षणन्‌‍क्षण भरभरून जगण्याची रसिकता! तिचं जगणं म्हणजे ओपन बुक‘ – प्रांजळ, निर्मळ, आरस्पानी. एका पुस्तकात शब्दबद्ध करणं अवघडतितकंच आवश्यक! तुम्हाआम्हा सर्वांसाठी.

Categories: ,

मृणालिनी चितळे : कथा, ललित लेख, मुलाखत, नाटुकली अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन. स्त्री मासिकामध्ये कार्यकारी संपादक पदावर सहा वर्षे काम. एकूण 22 पुस्तके प्रकाशित. पुस्तकांना राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर बारा वर्षे कार्यरत. स्त्री साहित्याचा मागोवा या प्रकल्पासाठी प्रबंध लेखन. कौन्सिलिंग आणि कुटुंब न्यायालय या क्षेत्रात विशेष काम. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील कार्यक्रमात सहभाग. पुणे महानगरपालिकेतर्फे सामाजिक कामासाठी गौरवपदक देऊन सन्मान. साहित्यदीप संस्थेतर्फे कथादीप पुरस्कार, तसेच अनेक मानाचे पुरस्कार. साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानासाठी तेजस्विनी पुरस्कार.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निलू निरंजना”

Your email address will not be published. Required fields are marked *